Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

स्वारगेट मेट्रो स्टेशनला नानासाहेब पेशवे यांचे नाव देण्याची मागणी

पुणे: श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त शनिवारवाडा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, योगेश समेळ, संदीप खर्डेकर, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, माधव गांगल,जगन्नाथ लडकत, आनंद दवे, मकरंद माणकीकर, मनोज तारे, किशोर येनपुरे, रविंद्र कुलकर्णी उपस्थित होते.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, सगळे युगपुरुष जाती-जातीमध्ये अडकले आहेत. या सगळ्या महापुरुषांना एकत्र आणायला हवे. नानासाहेब पेशवे यांचे पर्वतीवर वास्तव्य होते. त्यामुळे स्वारगेट मेट्रो स्टेशनला त्यांचे नाव द्यावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

कुंदन कुमार साठे म्हणाले, पुणे शहराचा विस्तार पेशवाई काळात नानासाहेब पेशवे यांनी केला. त्यांच्या काळात कात्रज ते शनिवारवाडा पाईपलाईन, पेठांचा विस्तार यामधून त्यांनी पुण्याचा विकास केला. आणि पुण्याला देशाची राजधानी बनविले. त्यामुळे स्वारगेट येथे होणाऱ्या मेट्रो स्टेशनला श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचे नाव द्या, अशी मागणी त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading