Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

काँग्रेस तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सोमवार     दि. ०६/१२/२०२१ रोजी काँग्रेस भवन, पुणे येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  रमेशदादा बागवे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेविका लताताई राजगुरू, सेवादल अध्यक्ष प्रकाश पवार, अल्पसंख्याक सेलचे अधयक्ष यासीन शेख, माजी नगरसेवक शिवाजी बंगर, भगवान कडू, डॉ. अनुप बेगी, मिरा शिंदे, दुर्गा शुक्रे, विठ्ठल गायकवाड, रमाकांत साठे, देविदास लोणकर, अस्लम मिरजकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिलार रतनगिरी यांनी केले व आभार प्रदर्शन अक्षय रतनगिरी यांनी केले. तसेच यावेळी विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading