Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त सहस्त्र दिवे लावून अभिवादन

पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त राजर्षी शाहू महाराज चौक बोपोडी तसेच सम्यक विहार व विकास केंद्र या ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
तसेच संध्याकाळी राजर्षी शाहू महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३५ फुटी भव्य तैलचित्रास पुष्प अर्पण करुन हजारो दीप लावून एक अनोख्या प्रकारे  अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनिता वाडेकर,आमदार सिद्धार्थ शिरोळे,रिपाईं नेते परशुराम वाडेकर,माजी नगरसेवक आनंद छाजेड,रिपाईं शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम,सचिव संतोष खरात,सचिन चव्हाण,शहर उपाध्यक्ष जोएल अन्थोनी, भिमराव वाघमारे,राजेंद्र शिंदे,निलेश वाघमारे,आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रभाग क्र.८ चे पदाधिकारी आण्णा आठवले,नंदाताई निकाळजे,राजश्री कांबळे,सीमा भंडारे मावशी बाळा मोरे आरिकस्वामी रिकेश पिल्ले व तसेच प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.ज्ञानेश जावीर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading