Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNE

अभय योजना न राबविता दंडासह कर वसूल करावा -कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांची मागणी

पुणे : मिळकत कर वसूल करणेस प्राधान्य देणे ऐवजी करचुकवेगिरी करणा-यांना दंडात सवलत देणे हे प्रामाणिक करदात्यांवर अन्याय केल्यासारखे असून अभय योजना न राबविता दंडासह कर वसूल करावा अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.

बागूल म्हणाले की, अभय योजनेसाठी भाजपसहित अन्य राजकीय पक्ष देखील 1 कोटी ते 2 कोटी पर्यंत थकबाकी असलेल्यांसाठी अभया योजना राबवा अशी भूमिका घेतात. वास्तविक कर वसूली करणेची भूमिका घेणे अपेक्षित आहे. पुणे महापालिकेने यापूर्वी मिळकत कराची अभय योजना राबविली असता कोटयावधींचा दंड माफ केल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. आता पुन्हा 1 कोटीपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या 700 ते 800 मिळकती असून यांची मुददल 1260 कोटी व दंड 2900 कोटी असून दंडाची 75 टक्के रक्कम माफ केल्यास 2175 कोटींची थकबाकी माफ होणार आहे. व्याजाची रक्कम माफ करणे संस्थेच्या हिताचे नाही. अशा प्रकारे कोटयावधींची माफी वारंवार दिल्यास नागरिकांची कर वेळेत भरणेची आर्थिक शिस्त बिघडेल त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी होर्डिंग पॉलिसी व अन्य मार्ग असून याचा विचार करावा अशी मागणीही बागुल यांनी केली आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading