मध्यवस्तीतील १०० रिक्षाचालकांची नेत्रतपासणी व चष्मे वाटप
पुणे : वाहन चालवताना दृष्टी चांगली असणे गरजेचे आहे. परंतु अनेकदा रिक्षाचालक कळत-नकळत दृष्टीदोषाकडे दुर्लक्ष करतात. त्यातून डोळ्यांचे मोठे विकार उद््भविण्याची शक्यता असते. त्यामुळे मध्यवस्तीतील रिक्षाचालकांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात तब्बल १०० रिक्षाचालकांनी सहभाग नोंदविला.
आधार सोशल फाउंडेशन व उत्कर्ष महिला मंडळाच्या वतीने सदाशिव पेठेतील उपाशी विठ्ठल मंदिरात करण्यात आले. शिबिराचे संयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक दिलीप काळोखे, सविता काळोखे व काळोखे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. यावेळी कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचे विश्वस्त राजेंद्र बलकवडे, राजेंद्र पठारे, दिलीप नलावडे, माऊली पासलकर, कसबा भाग कार्यवाह राहुल पुंडे, मठ मंदिर संपर्कप्रमुख राजेंद्र कुलकर्णी, भाजपा पुणे शहर रिक्षा आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले, सरचिटणीस अनिल झेंडे, कोषाध्यक्ष अमर दुबे, पुणे शहर रिक्षा फेडरेशनचे सल्लागार चंद्रकांत गोडबोले, खजिनदार बापू भावे, सचिन शुक्ल, अनिल काळोखे, प्रसाद जोशी, मंदार रांजेकर, पप्पू शिंदे, गणेश येनपुरे, राजेंद्र शिंदे, राजु आखाडे, पुरण हुडके, शाम केवटे, निरंजन गोळे आदी उपस्थित होते.
यावेळी टेलिफोन एक्सचेंज रिक्षा स्टँड, शिवांजली रिक्षा स्टॅन्ड, दत्तात्रेय जागडे, दत्तात्रेय दारवटकर, नागनाथ पार रिक्षा स्टॅन्ड, महालक्ष्मी रिक्षा स्टॅन्ड, जय गणेश रिक्षा स्टँड, पेरुगेट रिक्षा स्टॅण्डवरील रिक्षाचालक व मालक शिबिरात सहभागी झाले होते.
यावेळी टेलिफोन एक्सचेंज रिक्षा स्टँड, शिवांजली रिक्षा स्टॅन्ड, दत्तात्रेय जागडे, दत्तात्रेय दारवटकर, नागनाथ पार रिक्षा स्टॅन्ड, महालक्ष्मी रिक्षा स्टॅन्ड, जय गणेश रिक्षा स्टँड, पेरुगेट रिक्षा स्टॅण्डवरील रिक्षाचालक व मालक शिबिरात सहभागी झाले होते.
दिलीप काळोखे म्हणाले, रिक्षाचालकांची रिक्षा चालविताना दृष्टी चांगली असणे अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु अनेकदा रिक्षा चालक किरकोळ दृष्टीदोषाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे रिक्षाचालकांना दृष्टिदोष निदर्शनास आणून देणे व त्यावर वेळीच उपचार मिळावेत यासाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले. पुढील काळात संस्थेच्यावतीने अशी शिबिर घेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
