Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात आल्यावर कामे झाली – देवेंद्र फडणवीस

पुणे : जनतेच्या मनात, पुणेकरांच्या मनात केवळ भाजप आहे. कारण भाजपने केलेला विकास त्यांनी बघितला आहे. वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात ही पालिका होती. पण त्यावेळी पुणेकरांच्या हिताची कामे झाली नाहीत. कोरोनाच्या काळात नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा करत होते. पुणे महानगरपालिकेने कोरोना काळात खूप मोठे कार्य केले असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. पुणे महानगरपालिकेजवळ भाजपच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर ते सभेत बोलत होते.

या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील भाजपचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ”महापालिकेवर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही’असा विश्वास व्यक्त केला आहे.

कार्यालयाचे उद्घाटन असल्याने कार्यकर्ते स्वतः आले आहेत, जर आम्हाला शक्तीप्रदर्शन करायचे असेल तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. जे सावरकरांचा अपमान करतात. त्यांना महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, सावरकरवादी आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार चालतो असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading