Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

पुणे: राज्यात थंडी सुरू असतानाच पावसाने पुनरागमन केले आहे. मुंबई आणि कोकणाला  मुसळधार पावसाने  झोडपून काढल आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात  पाऊस पडला. तसेच बुधवारी  पुणे परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यातच राज्यात पुढील 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
लक्ष्यदीप, मालदीवजवळ चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे  कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच पुन्हा एकदा कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मध्यम  ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या ढगांमुळे हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. किनारपट्टीवरील गोवा, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading