Monday, November 2, 2026
Latest NewsPUNE

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्र आता हिंदी भाषेत

पुणे : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर प्रा. रतनलाल सोनाग्रा यांनी ‘विठ्ठल रामजी शिंदे’ यांचे चरित्र हिंदीमध्ये लिहले असून सदरील पुस्तकाची पहिली प्रत सोनाग्रा यांनी नुकतीच मा. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना अर्पण केली. या प्रसंगी
किरण तावरे, सुमन मर्चंट, सरकार निंबाळकर, आरती सोनाग्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
 
प्रा. रतनलाल सोनाग्रा म्हणाले की “महर्षी विठ्ठल रामजी शिंदे” यांनी स्थापित केलेल्या प्रार्थना समाजाला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. शिंदे यांनी स्वतःचे आयुष्य दलितांसाठी वंचितांसाठी अर्पित केले त्यांचे कार्य देशपातळीवर जावे आणि तळागाळातील लोकांना कळावे म्हणून “विठ्ठल रामजी शिंदे” यांच्यावर त्यांच्या नावानेच हिंदी भाषेमध्ये हे पुस्तक लिहले आहे. ते पुढे म्हणाले की भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे नाव प्रतिभा ठेवावे असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यांच्या घरातल्यांना सुचविले होते.
मुरळीची प्रथा बंद, मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण ‘मुंबई इलाखा शेतकरी परिषदे’चे नेतृत्व अशा अनेक समाजहिताच्या गोष्टी शिंदे यांनी केल्या. त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख चढता आहे. सदरील पुस्तक वाचकांपुढे आणताना आनंद होतोय.
 
आरती सोनाग्रा म्हणाल्या की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न केले आहेत.

Leave a Reply