Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन च्या वतीने भावे प्राथमिक शाळेमध्ये अनाथ मुला-मुलींसोबत दिवाळी महोत्सव

पुणे: रुवर्य श्री संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन च्या वतीने भावे प्राथमिक शाळेमध्ये अनाथ मुला-मुलींसोबत दिवाळी महोत्सव म्हणजे मामाच्या गावाची सहल असा कार्यक्रम साजरा झाला यामध्ये पुणे शहरातील १) धर्मवीर शंभू राजे आणाथालय (हडपसर), २) घरटे प्रकल्प बचपन बचाव संस्था (हडपसर), ३) सुमती बालवन अनाथ आश्रम (गुजरवाडी कात्रज) यांच्या आश्रम शाळेतील ९० मुला मुलींनी सहभाग घेतला. 


विद्यार्थ्यांना दुपारी ३ वाजता भावे प्राथमिक शाळा सदाशिव पेठ येथे आणण्यात आले प्रथम त्यांना नाष्टा देण्यात आला त्यानंतर ४ ते ८ या वेळेमध्ये विविध  स्पर्धात्मक उपक्रम राबवून प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक च्या मुला-मुलींना पुणे शहर भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी पाव-भाजी पुलाव चा आनंद लुटला सदर प्रसंगी  प्रकाश ढमढेरे, अमित कंक, दिपक पोकळे, ओम कासार, विलास सणस, उमेश आण्णा चव्हाण, सुरेश खाटपे मान्यवर उपस्थित होते.

राघवेंद्र बापू मानकर म्हणाले की, आपण सर्वांनी करोना महामारी नंतर प्रथमची दिवाळी उत्साहाने साजरी केली परंतु या अनाथ आश्रमातील मुलामुलींसाठी दिवाळी साजरी करून आपण आपल्या समाजाचे काहीतरी देणे लागतो याची जाणीव ठेवून अनाथ विद्यार्थ्यांबरोबर दिवाळी साजरी करून नाईक फाउंडेशन ने आजच्या तरुणांना नवीन पायंडा घालून दिला आहे आजकाची तरुण पिढी आपल्या वाढदिवसानिमित्त मोठे-मोठे केक कापून फार्म हाऊस वर  रंगीत पार्ट्या करतात त्या सर्व तरुणांना आपल्या पैशाची अशी उधळण करण्यापेक्षा अनाथाश्रमातील मुला मुलींना कपडे शालेय साहित्य शैक्षणिक खर्चाचा वाटा उचलावा व त्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदा चे क्षण जतन करावेत, नाईक फाउंडेशनचे अध्यक्ष श्री तेजस जाधव व त्यांचे कार्यकारी मंडळ सर्वजण तरुण आहेत त्यांनी या केलेल्या कार्याची तरुणपिढी नक्कीच आदर्श घेतील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन फाउंडेशन च्या कार्यास शुभेच्छा दिल्या , सदर प्रसंगी मानकर यांच्या हस्ते उमेश बॉक्सिंग एकेडमी मधील राज्यस्तरीय रौप्य पदक मिळवणाऱ्या कु.रिया कुटे, कु.साई थोडमीशे यांचा सत्कार करण्यात आला, हा सर्व उपक्रम  शैलेश खाणेकर, किरण पिरंगुटे, यश खाणेकर, प्रितम मळेकर, निलेश निर्मळे, ओंकार दिसले यांच्या सहकार्याने संपन्न झाला.

सदर प्रसंगी प्रास्ताविकात फाउंडेशनचे अध्यक्ष तेजस जाधव म्हणाले की आम्ही फाउंडेशन च्या वतीने शहरातील सर्व तरुणांना व विविध ग्रुप यांना आव्हान करतो की आपण यापुढे आपले वाढदिवस अशा आश्रम शाळेमध्ये जाऊन साजरे करावे आम्ही आपल्याला मदत करू, फाउंडेशन च्या कार्याची माहिती डॉ अमरसिंह भोरे यांनी दिली, प्रास्ताविक मार्गदर्शक प्रकाश ढमढेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन निलेश खाणेकर यांनी केले.

Leave a Reply