Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

पुणे ओपन गोल्‍फ चॅम्पियनशीपचे पाचव्‍या पर्वासह पुनरागमन

पुणे : टाटा स्‍टील प्रोफेशनल गोल्‍फ टूर ऑफ इंडिया (पीजीटीआय) ही भारतातील व्‍यावसायिक गोल्‍फला अधिकृत मान्‍यता देणारी संस्‍था १ ते ४ डिसेंबर २०२१ पर्यंत पूना क्‍लब गोल्‍फ कोर्स येथे पुणे ओपन गोल्‍फ चॅम्पियनशीपचे पाचवे पर्व आयोजित करणार आहे. हंगाम-समापन टाटा स्‍टील टूर चॅम्पियशनशीपपूर्वी आयोजित करण्‍यात येणा-या टाटा स्‍टील पीजीटीआयच्‍या २०२०-२०२१ हंगामाचा शेवटचा फुल-फिल्‍ड इव्‍हेण्‍ट असलेल्‍या या स्‍पर्धेची बक्षीसाची रक्‍कम ४० लाख रूपये आहे. ५ डिसेंबर रोजी प्रो-अॅम इव्‍हेण्‍टचे आयोजन करण्‍यात आले आहे. 

या स्‍पर्धेमध्‍ये अग्रगण्‍य भारतीय खेळाडू असणार आहेत जसे गतविजेता क्षितिज नवीद कौल, मनू गंडास, युवराज सिंग संधू, ओम प्रकाश चौहान, अक्षय शर्मा, मुकेश कुमार, शमीम खान आणि अमरदीप मलिक. आंतरराष्‍ट्रीय चॅलेंजचे नेतृत्‍व करणार आहेत श्रीलंकन मिथून परेरा, अनुरा रोहना, एन थंगराजा व के प्रबागरन, बांग्‍लादेशी मोहम्मद जमाल हुसैन मोल्‍ला व बादल हुसेन, तसेच ऑस्‍ट्रेलियन कुणाल भसिन. यजमान पुणे शहराचे प्रतिनिधित्‍व गुर्की शेरगिल, प्रविण पाठारे, समीर एम. शेख, राजीव दातार, सागर रघुवंशी, जयदीप पटवर्धन व सुनिल बाबुराव गलफडे, तसेच हौशी रोहन ढोले पाटील हे व्‍यावसायिक खेळाडू करणार आहेत. ही ७२-होल स्‍ट्रोक-प्‍ले स्‍पर्धा आहे. या स्‍पर्धेमध्‍ये १२६ खेळाडू आहेत, ज्‍यापैकी १२३ व्‍यावसायिक आणि तीन हौशी खेळाडू आहेत. पहिल्‍या ३६ होल्‍सनंतर कट वापरण्‍यात येईल. अव्‍वल ५० खेळाडू व टाईज हाफवे कट करतील आणि आणखी ३६ होल्‍ससाठी खेळत राहतील.  

पीजीटीआयचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी उत्तम सिंग मुंडी म्‍हणाले, पाचव्‍या पर्वामध्‍ये असलेली पुणे ओपन आज देशाच्‍या पश्चिम प्रांतामधील पीजीटीआयची सर्वात प्रख्‍यात इव्‍हेण्‍ट बनली आहे. यंदा पुढील महिन्‍यामध्‍ये आयोजित करण्‍यात येणा-या हंगाम-समापन टूर चॅम्पियनशीपपूर्वी अंतिम पीजीटीआय इव्‍हेण्‍ट म्‍हणून पुणे ओपनच्‍या उत्‍साहामध्‍ये अधिक भर करण्‍यात आली आहे. टूर चॅम्पियनशीपसाठी टॉप-६० मध्‍ये स्‍थान मिळवण्‍याची संधी असल्‍यामुळे ही स्‍पर्धा रोमहर्षक असण्‍याची अपेक्षा आहे. खेळाडू या स्‍थानांसाठी आणि पुढील वर्षासाठी सूट मिळवण्‍यासाठी स्‍पर्धा करतील. 

पूना क्‍लब गोल्‍फ कोर्सचे कॅप्‍टन श्री. ललित चिंचणकर म्‍हणाले, पुणे ओपन ही सर्वोच्‍च पातळीवर गोल्‍फ खेळाचा अनुभव घेण्‍यासाठी आमचे ज्‍युनिअर व हौशी गोल्‍फर्ससाठी उत्तम संधी आहे, ज्‍यामुळे त्‍यांना त्‍यांच्‍या खेळामध्‍ये लाभ होईल. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading