पुण्यातील लक्ष्मी फ़ॉरेक्सला रिझर्व्ह बँकेकडून एडी २ परवाना
पुणे : पुणे स्थित लक्ष्मी फ़ॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड या परकीय चलन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेला रिझर्व्ह बँके ऑफ इंडिया कडून एडी २ हा परवाना मिळाला आहे. अशा प्रकारचा परवाना मिळणारी लक्ष्मी फ़ॉरेक्स ही राज्यातील (मुंबई वगळून) पहिलीच संस्था ठरली आहे. ऑथोराईज्ड डीलर श्रेणी २ अर्थात एडी २ हा परवाना पकीय चलन क्षेत्रातील काही विशिष्ट सेवा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येतो.
गेली १७ वर्षे पुणे आणि लगतच्या परिसरातील ग्राहकांना आम्ही परकीय चलन क्षेत्रातील विविध सेवा देत आहोत. याआधी आम्ही आरबीआयचे अधिकृत फुल फ्लेजड मनी चेंजर म्हणून कार्यरत होतो. आमच्या चांगल्या कामाची दखल घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आम्हाला यापुढील श्रेणीत आणले याचे समाधान आहे. आता आम्ही ग्राहकांना परकीय चलन क्षेत्रातील आधी पेक्षा जास्त सेवा एका छताखाली देण्यासाठी सज्ज आहोत, अशी माहिती लक्ष्मी फ़ॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक निशिकांत भालेराव यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की या परवान्यामुळे आता आम्ही एका आर्थिक वर्षात प्रतिव्यक्ती तब्बल २.५ लाख अमेरिकी डॉलर इतक्या रकमे पर्यंतचा निधी आमच्या ग्राहकांकरिता परदेशी पाठवू शकतो. यामुळे परदेशी शिक्षण घेणारे विद्यार्थी व त्याने पालक यांना परदेशी विद्यापीठांची फी भरणे अधिक सोपे होईल. याबरोबरच परदेशात वैद्यकीय उपचारासाठी जाणे, एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित होणे, परदेशात असणाऱ्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना कोणत्याही कारणासाठी मोठी रक्कम पाठवणे आदी गोष्टी कागदपत्रांची पूर्तता केल्यावर आम्ही सक्षमपणे करू.
परकीय चलन आणि त्यासंबंधी सेवा या प्रामुख्याने पुणे व मुंबई या सारख्या शहरांमध्ये उपलब्ध असल्याने राज्यातील इतर भागातील ग्राहकांना यासंबंधी कामासाठी पुणे किंवा मुंबई येथे यावे लागते. आता आरबीआयने आम्हाला ऑथोरायीइझ्ड डीलर श्रेणी २ हा परवाना दिल्यामुळे आम्ही आमचे सेवा क्षेत्र विस्तारू आणि राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर या सारख्या शहरांमध्ये शाखा सुरु करून तेथील ग्राहकांची यासंबंधीची गैरसोय दूर करू असे लक्ष्मी फ़ॉरेक्सच्या संचालिका पूनम भालेराव यांनी सांगितले.
