Saturday, May 9, 2026
Latest NewsNATIONALTECHNOLOGYTOP NEWS

आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ

मुंबई : आयआयटी, मुंबईचे विद्यार्थी राहिलेले पराग अग्रवाल यांची मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरच्या कार्यकारी प्रमुख पदी (CEO) नियुक्ती करण्यात आली आहे. जॅक डोर्सी यांनी सोमवारी आपल्या CEO पदाचा राजीनामा दिला असून अग्रवाल यांची नवीन CEO म्हणून निवड केली आहे. जॅक डॉर्सी हे गेल्या 16 वर्षांपासून ट्विटरचे CEO होते.

जॅक डोर्सी राजीनामा देताना म्हणाले की, कंपनीत सह-संस्थापक ते सीइओ त्यानंतर अध्यक्ष ते कार्यकारी अध्यक्ष त्यानंतर अंतरिम-सीईओ ते पुन्हा सीईओ असा 16 वर्षांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर, आता मला कंपनी सोडण्याची वेळ आली आहे. माझ्यानंतर पराग अग्रवाल कंपनीचा नवा सीईओ असेल.

पराग अग्रवाल यांनी आयआयटी मुंबईतून इंजिनीअरिंग केले आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली. ट्विटरवर येण्यापूर्वी पराग यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च, याहू रिसर्च आणि एटी अॅन्ड टी लॅबमध्येही काम केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading