Tuesday, May 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Omicron : दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण

मुंबई : कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या प्रकराने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतणाऱ्या नागरिकांचे ट्रेसिंग व टेस्टींग सुरू आहे. यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आलेत. तसेच त्याला ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही? हे तपासणी अहवाल आल्यावरच कळेल असेही स्पष्ट केले आहे.

द. आफ्रिकेतून मुंबईत आलेत 1 हजार नागरिक 

ओमिक्रॉनच्या भीतीने दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्या प्रवाश्यांचे ट्रेसिंग सुरू आहे. गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून तब्बल 1 हजार प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण आणि बीएमसीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध सुरु असून 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून 1 हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. या सर्वांना ट्रेस केलं जात आहे. जे मुंबईत आहेत, त्यांची माहिती घेतली जात आहे. दोन-तीन देश आज लॉकडाऊनमध्ये आहेत. पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाहीय. पण काळजी घेणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading