Monday, May 4, 2026
Latest NewsPUNE

महापालिका निवडणुक आघाडी संदर्भातील निर्णय वरिष्ठ नेते घेतील – प्रशांत जगताप

पुणे : महानगरपालिका निवडणूकित महाविकास आघाडी मधील घटक पक्ष एकत्र लढणार का याची चर्चा गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे त्यावर
आमच्या पक्षां मधील वरिष्ठ पातळीवरचे नेते महानगरपालिका निवडणुकीत महा विकास आघाडी मधील घटक पक्ष एकत्र लढणार की नाही याचा निर्णय घेतील. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे,शिवसेना शहर अध्यक्ष संजय मोरे,
राष्ट्रवादीचे पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख उपस्थित होते.
आज महा विकास आघाडी मधल्या घटक पक्षामध्यल्या नेत्यांनी 2  दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दोन वर्षात सरकारने कशी कामे केली याची माहिती सांगितली.
अंकुश काकडे म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठका या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे थोड्याच दिवसात बैठका घेणार आहेत. असे अंकुश काकडे म्हणाले.
नवाब मलिक यांच्या वर भाजपचे नेते वारंवार टीका करत आहेत त्यावर अंकुश काकडे म्हणाले
नवाब मलिक खूप चांगले काम करत आहेत.
विरोधकांकडून त्यांना गप्प बसण्याचे काम चालले आहे. असे काकडे म्हणाले.
नुकत्याच झालेल्या पुणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बाकडे, बादल्या आणि पिशव्यांच्या खरेदीवरील बंदी हटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे, काँग्रेसचे पुणे शहर काँग्रेसचे रमेश बागवे यांनी प्रसिद्ध पत्रक काढून हा निर्णय मागे घ्यावा नाहीतर आम्ही आंदोलन करणार असा इशारा दिला होता. त्यावर प्रशांत जगताप म्हणाले, आम्ही पुण्याचा विकास कसा करायचा या दृष्टीने पावले उचलत आहोत. असे प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading