Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

संविधान दिनानिमित्त बसपाच्या वतीने मान्यवरांचा सांविधान देऊन सन्मान

पुणे : भारतीय संविधान हाच बहुजन समाज पार्टीचा जाहीरनामा असुन त्याची अंमलबजावणी करणे हा मुख्य उद्देश आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड.संदीप ताजने यांनी व्यक्त केले .

बहुजन समाज पार्टी च्या कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघाचे वतीने पुणे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष हुलगेश चलवादी यांनी सर्व समाजातील १३०कोटी जनतेला एकत्रित घेऊन जाणारा व सर्वांना न्याय देणारा ग्रंथ म्हणजे संविधान आहे असे म्हटले . बहुजन समाज पार्टीच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने संविधान सन्मान सोहळ्याचे वेळी पुणे जिल्ह्याचे प्रथम नागरिक जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र देशमुख ,पोलीस आयुक्त अमित गुप्ता ,पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार ,सहा.धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण ,सह धर्मदाय आयुक्त बुके साहेब यांचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांच्या हस्ते संविधान ,महात्मा फुले पगडी ,शॉल देऊन सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र महासचिव सुदीप गायकवाड ,सचिव भाऊसाहेब शिंदे ,पुणे जिल्हा अध्यक्ष हुलगेश चलवादी ,पुणे जिल्हा प्रभारी रमेश आप्पा गायकवाड ,अतुल सोनवणे ,शफीक शेख ,महासचिव सागर खंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading