Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : वेळच्यावेळी आरोग्याची तपासणी करणे काळजी गरजेचे आहे. मात्र तपासणीसाठी लागणारा खर्च सामान्य माणसाला परवडणारी नाही. हीच सामाजिक बांधीलकी जपत अमित शेलार युथ फाऊंडेशन व शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या
वतीने नुकतेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांच्या आरोग्याच्या तपासणी करण्यात आली तसचे १० हजार नागरिकांना आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित नागरिकांच्या आरोग्याची तपासणी पुण्यातील नामांकित डॉक्टर आणि सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिराचे उद्घाटन मा. मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले….! यावेळी मा.आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, पोलीस उपअधीक्षक दिलीप खेडेकर, उत्तेकर तसेच नगरसेवक साईनाथ बाबर, सतीश म्हस्के, निवृत्ती बांदल (सरपंच) आदी मान्यवर उपस्थित होते. सदरील शिबिरासाठी अमित शेलार युथ फाऊंडेशनच्या व शिवस्वराज्य प्रतिष्ठान सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. अमित अनंतराव शेलार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading