Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRA

Parabhani – महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर भाजपचे जोरदार आंदोलन

परभणी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने अडचणीत आणि संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी वीज बिल वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा तोडून अन्याय करणार्‍या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी (दि.26) भारतीय जनता पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी ठाण मांडून जोरदार निदर्शने केली.

जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना परभणीच्या पालकमंत्र्यांना शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही मात्र शाहरुख खानच्या पोराची आणि स्वतःच्या जावायाची वकिली करायला वेळ आहे. पालकमंत्री जर परभणीला आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासविण्यात येणार आहे, असा इशारा यावेळी दिला. भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिला. यावेळी आ. मेघना बोर्डीकर, आ. मोहन फड, ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उद्धवराव नाईक, खंडेराव आघाव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ.  विद्या चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, महिला – पुरुष शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading