‘गंगोत्री रिडेव्हलपमेंट फेस्टिवल’ मधील प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे : वाढत्या पुण्याच्या नगर नियोजनात महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या रिडेव्हलपमेंट ( पुनर्विकास ) विषयावरील प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार घाटे, उद्योजक सुहासिनी मेहेंदळे, श्रीनिवास बडवे
यांच्या हस्ते आज करण्यात आले. 

सर्वंकष विचार मंथन करण्याकरिता ‘गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज‘ यांच्यातर्फे  ‘गंगोत्री रिडेव्हलपमेंट फेस्टिवल ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. गृह बांधणी विषयक प्रदर्शन, परिसंवाद, घर संकल्पनेला धरून काव्य आणि संगीत कार्यक्रम असे या फेस्टिवलचे स्वरूप आहे. मनोहर मंगल कार्यालय येथे २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा फेस्टिवल होईल. फेस्टिव्हलचे संयोजक राजेंद्र आवटे, गणेश जाधव, मकरंद केळकर यांनी स्वागत केले. गृहबांधणी विषयक प्रदर्शन तीनही दिवस सकाळी 10 पासून सायंकाळी ९ पर्यंत सुरू असणार आहे

Leave a Reply

%d bloggers like this: