fbpx
Wednesday, April 24, 2024
ENTERTAINMENTLatest News

‘रात्रीस खेळ चाले ३’मधील शेवंता बदलणार; ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘शेवंता’ 

‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेला पहिल्या २ पर्वांप्रमाणेच प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. तळ कोकणातील एका गावात घडत असलेल्या या कथेतील अण्णा नाईक, पांडू , माई , शेवंता, वच्छी, दत्ता आदी पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मात्र या मालिकेतून ‘शेवंता’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही एक्जिट घेत आहे. तर आता ही भूमिका अभिनेत्री कृतिका तुळसकर साकारणार आहे.
भूमिके विषयी बोलताना कृतिका म्हणाली, “रात्रीस खेळ चाले ही मालिका आणि त्यातील पात्र ही खूप लोकप्रिय असून प्रेक्षक त्यावर खूप प्रेम करतात. शेवंता ही भूमिका माझ्या वाट्याला आली असली तरी त्या भूमिकेच्या लोकप्रियतेकडे पाहता ही भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. शेवंताची भूमिका साकारणे हा तिच्या अभिनय क्षेत्रामधील कारकिर्दीतला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आहे. मी अशा करते कि प्रेक्षकांना माझं काम आवडेल आणि ते मला शेवंता म्हणून स्वीकारतील.”
कोण आहे अभिनेत्री कृतिका तुळसकर
कृतिका गेली १८ वर्षात थिएटर माध्यमात कार्यरत असून तिने अनेक नाटक आणि चित्रपटात काम केलं आहे. कृतिका एक नृत्यांगना आहे, ती कथ्थक विशारद आहे. प्रोफेशनली सायकॉलॉजिस्ट असलेली कृतिका आपली आवड जोपासण्यासाठी अभिनय क्षेत्राकडे वळली.
‘वच्छी’ची एन्ट्री 
नवीन शेवंताला प्रेक्षकांकडून नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही. सध्या मालिकेत अजून एका नवीन व्यक्तिरेखेच्या एन्ट्रीमुळे मालिका रंजक
 वळणावर आली आहे. वच्छी हे पात्र पुन्हा एकदा मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत असून ती एका नवीन लुक मध्ये दिसतेय. आता या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढवली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading