चंद्रकांत पाटील यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री तसेच भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांची भेट घेतली.

मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मा. अमित शाह यांना भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली व त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मा. अमित शाह यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत उभय मान्यवर नेत्यांची चर्चा झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: