PMC – १ कोटीच्या फसवणूक प्रकरणी अतिरिक्त आयुक्तांची बदली करावी उज्वल केसकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे:१ कोटी ची बोगस बिलांची फाईल करून महापालिकेला १ कोटीला गंडा घालण्याचा जो प्रकार झाला त्यात ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत , ते ते अधिकारी निर्दोष साबित होत नाहीत तोवर त्यांच्याकडून कार्यभार काढून घ्यावा म्हणजे च त्यांना निलंबित करावे असे आदेश महापौरांनी भसभागृहात देऊनही तसे महापालिका प्रशासनाने केले नाही .उलट अतिरिक्त आयुक्त यांनी चौकशी समिती बसवली आणि त्या चौकशी समितीचा अहवाल आणि त्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर त्या अधिकार्‍याचे काय करायचे याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले, ही चुकीची प्रथा आहे आणि महापौरांच्या आदेशाचा अवमान करणारी आहे .

महापौरांनी सभागृहात मध्ये दिलेला आदेश कायदेशीर असताना त्याकडे दुर्लक्ष करून चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे खेमनार यांच्या कारभाराबाबत शंका निर्माण होत असल्याने त्यांना तातडीने पुण्यातून बदली करून अन्यत्र हलविणे गरजेचे आहे असे केसकर यांनी म्हटले आहे .
भर सभागृहात महापौरांनी दिलेले कायदेशीर आदेश न पाळता कारभार करणे हे गंभीर असून या प्रकरणी ताबडतोब अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांची बदली करावी अशी मागणी महापालिकेतील माजी विपक्षनेते उज्वल केसकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: