कराडस्थित आर्किटेक्टवरील प्राणघातक हल्ल्याचा जाहीर निषेध

पुणे: कराड येथील व्यवसायाने आर्किटेक्ट असणाऱ्या जितेंद्र भंडारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यासंदर्भात इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर, महाराष्ट्र विभागाच्या वतीने विविध प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देताना निषेध नोंदविण्यात आला. इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरच्या पुणे शाखेच्या वतीने मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. तसेच आजच्या दिवशी इन्स्टिट्यूटच्या सर्वच सदस्यांनी काळया फिती बांधून या घटनेचा निषेध करण्यात आला.
कराड येथील उपकेंद्राच्या वतीने यापूर्वीच गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई , खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील याबाबतचे निवेदन दिले असून अशा प्रवृत्तीवर प्रशासकीय वचक असावा यासाठी कठोर कायदे करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष संदीप बावडेकर म्हणाले की, अशा प्रकारचे हल्ले होणे ही सुसंस्कृत समाजाचे लक्षण नाही. प्रत्येक व्यावसायिकाच्या हक्कांची पायमल्ली होत असल्यास अशा घटांनाकडे प्रशासनाने देखील गांभीर्याने पहाणे अपेक्षित आहे. म्हणून यामुळे संस्था UDCPR मध्ये ना हरकत दाखल्याची तरतूद समाविष्ट करण्यासाठी नगरविकास मंत्रालायकडे पाठपुरावा करणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: