हवामान खात्यानं उद्या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला आहे. उद्याही दक्षिण कोकण आणि घाट परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं उद्या एकूण चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने उद्या सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये, तसेच मोठा झाडाच्या आडोशाला उभं न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: