विद्यार्थी परिषदेवर विद्यार्थ्यांचा विश्वास सातत्याने वाढताना दिसतो – शुभंकर बाचल अभाविप पुणे महानगर मंत्री

पुणे:अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी तुम्ही परिचित आहातच. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या या जगातील सर्वात मोठ्या परिषदेवर विद्यार्थ्यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

आपल्या कार्यामुळे जगप्रसिद्ध असणाऱ्या परिषदेत सातत्याने विद्यार्थी सहभागी होत चालले आहेत. शैक्षणिक समस्या मार्गी लावण्यासाठी, आपल्या हक्काचे शिक्षण मिळवण्यासाठी त्यांना परिषदेचा जाहीर पाठिंबा असतो. आजच्या या डिजीटल काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सोशल मीडिया अकाउंट्स वर देखील जोरदारपणे कार्य चालले आहे. मागील काळात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा बाहेर जमावबंदी होती, आणि शैक्षणिक समस्या देखील उद्भवल्या होत्या, तेव्हा अभाविप ने डिजीटल स्वरूपात आंदोलन केले होते. ट्वीटर वरून आंदोलन करून त्यांनी विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला.

अभाविप च्या कार्याला पाहता, विद्यार्थ्यांमध्ये उत्तुंग उत्साह येत असल्याचे दिसून येते. अभाविप पुणे महानगराच्या ट्वीटर अकाउंट ला १५००० फॉलोअर्स पूर्ण झाले. या आकड्याकडे पाहता लक्षात येते की अभाविप चे डिजीटल स्वरूपातील कार्य चांगलेच जोरात चालले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: