एसटी संप : एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार कडून पगारवाढीचं गाजर 

मुंबई : परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर राज्य सरकार कडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी तो स्वीकार करावा व तातडीने कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा शासन योग्य कारवाई करेल, असे राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

आज एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आणि राज्य सरकार यांच्यात बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते आमदार गोपीनाथ पडळकर, आमदार सदाभाऊ खोत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

अनिल परब म्हणाले, विलिनिकरणाच्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या त्रिस्तरीय समितीचा अहवाल 12 आढवड्यात येणार आहे. त्या समितीने विलिनिकरणाचा निर्णय दिला तर आम्हाला तो मान्य असेल. पण तोपर्यंत हा संपाचा तिढा सोडवण्यासाठी मूळ पगारात वाढ करण्यातचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही तब्बल 41 टक्के पगारवाढ असून एसटीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वाढ आहे.  नवीन पगार वाढ नोव्हेंबर पासून लागू होईल. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा 10 तारखेच्या आधी होईल, अशी ग्वाही आम्ही देतो.

विलीनिकरणाचा निर्णय राज्य सरकार घेणार नाही 

शासनाला जे शक्य आहे ते आम्ही केले आहे. आर्थिक नुकसानीत एसटी असताना देखील आम्ही हे पाऊल उचलले आहे. या पगारवाढीमुळे एसटीला प्रत्येक महिन्यांसाठी 360 कोटींचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे.  विलीनिकरणाचा निर्णय हा न्यायालयाची समिती घेईन राज्य सरकार घेणार नाही. न्यायालयाने विलिनिकरणाचा निर्णय दिला तर आम्हाला तो मान्य असेल.

इन्सेंटिव्ह योजना लागू करणार 

यापूर्वी कर्मचाऱ्याला काम नसेल तर त्याची रजा लागत होती. मात्र, आज आम्ही कामावर येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या दिवसाचा पगार मिळेल यांची हमी घेतो. तसेच जो कर्मचारी ज्यादा काम करून एसटीच्या उत्पन्नात भर घालेल त्या कर्मचाऱ्यांसाठी इन्सेंटिव्ह योजना लागू करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली.

प्रस्तावित पगारवाढ  

1 ते 10 वर्ष कार्यकाळ  पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना 5 हजारांची पगारवाढ

10 ते 20 वर्ष कार्यकाळपूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना 4 हजार वेतन पगारवाढ

20 वर्ष कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना 2 हजार 400 रुपयांची पगारवाढ

30 वर्ष कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रुपयांची पगारवाढ

इतर ठळक मुद्दे – 

  • कामावर येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या दिवसाचा पगार मिळणार
  • प्रत्येक महिन्याच्या 10 तारखे आगोदर कर्मचाऱ्यांचे पगार होणार
  • कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार
  • आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबयचा सहानुभूतीपूर्वक विचार करू

Leave a Reply

%d bloggers like this: