पुण्यामध्ये ओला एस१ आणि एस१ प्रोसाठी कस्टमर टेस्ट राईड्सना प्रचंड प्रतिसाद

पुणे : ओला एस१ आणि एस१ प्रो स्कूटर साठी ओला इलेक्ट्रिक देत आहे केवळ आमंत्रणाद्वारे कस्टमर टेस्ट राईड्स.  पहिल्या खरेदी टप्प्यामध्ये ज्या ग्राहकांनी स्कूटर खरेदी करण्यासाठी २०,००० रुपये किंवा संपूर्ण किंमत भरली आहे त्यांनाच, त्यांच्या प्रायॉरिटी डिलिव्हरी विंडोनुसार या टेस्ट राईड्समध्ये प्राधान्यक्रम दिला जात आहे.  कस्टमर टेस्ट राईड्स मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद आणि कोचीमधील ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आल्या असून पुढील काही दिवसात इतर शहरांमधील ग्राहकांना देखील त्यांचा लाभ घेता येईल.

या कॅम्प्समध्ये ओला एस१ चा टेस्ट राईड अनुभव घेण्यासाठी ग्राहकांनी आपले टेस्ट राईड स्लॉट्स बुक करावेत असे आमंत्रण देण्यात येत आहे.  पुण्यामध्ये हा कॅम्प फ्युच्युरा (वीवर्क), मगरपट्टा रोड, कीर्तने बाग, पुणे – ४११०२८ येथे आहे. ओला एस१ आणि एस१ प्रो या संपूर्ण जगभरासाठी भारतात तयार करण्यात येत असलेल्या स्कूटर्स ओला फ्युचरफॅक्टरी या जगातील सर्वात मोठ्या, सर्वात आधुनिक आणि पर्यावरणस्नेही दुचाकी फॅक्टरीमध्ये निर्मित आहेत.

सर्वोत्तम रचना, सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम कामगिरी यासारख्या अनेक, उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज अशा या स्कूटर्स आहेत.  ओला एस१ प्रो १० अतिशय अनोख्या, उठावदार आणि आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून, ओला एस१ मध्ये ५ रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.


किमती:

  • एक्स-शोरूम किंमत (भारतीय रुपयांमध्ये) (एफएएमई सबसिडी आणि जीएसटी समाविष्ट आहेत पण राज्य सबसिडी आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत)

o   ओला एस१ – ९९,९९९ रुपये

o   ओला एस१ प्रो – १२९,९९९ रुपये

  • अंतिम किंमत (भारतीय रुपयांमध्ये) (लागू असलेली ऑन-रोड किंमत – राज्य सबसिडी, एफएएमई सबसिडी, नोंदणी, हेल्मेट(स), विमा आणि आरएसए, झीरो डेप यासारख्या त्यांच्या पर्यायी ऍड-ऑन्स यांचा समावेश असलेली)

Leave a Reply

%d bloggers like this: