पुण्यातील थिएटर मालकांकडून ‘जयंती’ चित्रपटावर अन्याय – संभाजी ब्रिगेड

पुणे : ‘जयंती’ हा मराठी चित्रपट वैचारिक चळवळी वर आधारित आहे. सध्याच्या तरुणांनी स्वार्थी पक्ष्यांच्या नेत्यावर विश्वास न ठेवता स्वकर्तुत्वावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे, याचं वास्तव चित्रण दाखवणारा चित्रपट आहे. ‘गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारा चित्रपट म्हणजे जयंती.’ भक्त गुलाम असतात…’ प्रत्येक तरुणाने लक्षात घेतलं पाहिजे हे या चित्रपटात वास्तव पणे मांडलेले आहे. आम्ही व्याख्यानात, भाषणात किंवा वेगवेगळ्या बैठकांमध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून विचार मांडतो तेच विचार ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मोजक्या, चांगल्या पध्दतीने मांडले गेले आहे. चित्रपट दखलपात्र आहे. मात्र पुण्यातील थिएटर मालकांकडून ‘जयंती’ चित्रपटावर अन्याय केला जात असल्याचा आरोप  संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला आहे.  

छत्रपती शिवाजी महाराजांपासून विचारांचा वारसा घेतलेल्या प्रत्येक तरुणांने जातीय आणि धर्मांध विचारात न अडकता स्वाभिमानाने स्वकर्तृत्वावर पुढे गेला पाहिजे. तरूणांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन तो मोठा झाला पाहिजे हाच विचार या चित्रपटात मानला गेला आहे. स्वतः मोठं होत असताना आपल्या सोबतच्या मित्रांना सोबत घेऊन समाजाला चांगली दिशा देण्याचा प्रयत्न जयंती चित्रपटातून करण्याचा प्रयत्न केला आहे. महापुरुष नुसते फोटो किंवा डोक्यावर घेऊन चालणार नाही तर डोक्यात घेतले पाहिजे. त्यांचे विचार, चरित्र आणि चारित्र्य याचे वाचन केले पाहिजे. ‘ज्यांच्या घरात नाही पुस्तकाचे कपाट त्यांचं घर केव्हाही होऊ शकते सपाट…’ हे चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न जयंती चित्रपटाच्या टीमने केला आहे.

वाचन महत्त्वाचे. भरकटलेल्या तरुणांना खरा व सत्य इतिहास मांडणारी पुस्तकं वाचायला मिळाली तर तो वैचारिक परिवर्तन करू शकतो. तो स्वतः घडतो आणि इतरांना सुद्धा घडू शकतो हा या चित्रपटातील मतितार्थ. जय शिवराय… जय भिमराय…!! हे जातीवाचक घोषणा नसून सन्मानजनक आदरार्थी वाचक घोषवाक्य आहे, हे ठासून सांगण्याचा प्रयत्न या चित्रपट केलेला आहे. राजकीय पुढारी वेगवेगळ्या जातीच्या लोकांना हाताशी धरून स्वतःचं हित आणि राजकारण सांभाळतात. समाजातील कुठल्या घटकावर अन्याय झाला तर ते प्रकरण दाबण्याचा किंवा आरोपींना पाठीशी घालण्याचा घाणेरडा प्रकार करून चुका करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करतात. अशा पुढार्यांना वेळीच धडा शिकून पीडितांना न्याय मिळवून देणारी एक चांगली तरुणांची फळी निर्माण झाली पाहिजे. म्हणून चळवळी आणि चांगले कार्यकर्ते निर्माण व्हावेत हाच जयंतीचा अर्थ आहे.

मी चळवळीतील एक कार्यकर्ता असल्याने मला तो चित्रपट चांगल्या पद्धतीने भावला. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर हे जर चांगल्या पद्धतीने समजले त्यांच्या वैचारिक पुस्तकांचं वाचन केलं तर प्रत्येक व्यक्ती पेटून उठतो आमचा विश्वास आहे. तो जयंती चित्रपटाने द्विगुणित केला. जयंती सारखे चित्रपट सतत आले पाहिजेत. लोकांचे प्रबोधन झाले पाहिजे. समाज सुधारला पाहिजे. अंधश्रद्धा-कर्मकांड यांना मूठमाती देऊन प्रत्येकाने प्रयत्नवादी राहिले पाहिजे हाच चळवळीचा अर्थ आहे.

‘जयंती’ हा उत्तम मराठी चित्रपट असून मराठी चित्रपटाला पुण्यामध्ये थेटर मिळत नाही. जर हा चित्रपट पुण्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक थिएटरमध्ये प्रदर्शित झाला जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या चित्रपट स्वतः पाहिला तर नक्कीच विश्वास आहे व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वैचारिक गोंधळ घालेल आणि चांगली तरुणांची फळी वैचारिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत होईल. म्हणून सर्वांनी आपल्या आपल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात जयंती हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी चित्रपटावर जर अन्याय होणार असेल तर ‘संभाजी ब्रिगेड’ थेटर असोसिएशन यांना सोडणार नाही. वेळ पडली तर आम्हाला ‘जयंती’ या मराठी चित्रपटासाठी थिएटर मालकां विरोधात संघर्ष करावा लागेल आणि याची जबाबदारी हिटर मालकांचे असेल असेही शिंदे यांनी म्हटले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: