नागरी सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांना महापालिकेने पगार दिला नाही म्हणून मनसेचे आंदोलन
पुणे: पुणे महानगरपालिकेने कचरा वाले व विविध कामगारांचे अजूनही पगार दिले नाहीत. नागरी सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांचे ते पण महानगरपालिकेने अजून पगार दिले नाहीत. म्हणूनच मनसेने पालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या समोर कर्मचाऱ्यांना पगार द्यावा म्हणून आज मनसेने आंदोलन केले.
या आंदोलनात मनसेच्या माजी शहराध्यक्ष रूपाली पाटील ठोंबरे, नगरसेवक साईनाथ बाबर, पुणे महानगर पालिकेतील मनसेचे नगरसेवक, व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलनात महापालिकेने नागरी सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांना महापालिकेने पगार दिला नाही म्हणून महापालिकेचा निषेध करण्यात आला.
रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, महापालिकेने वीविध कर्मचाऱ्यांचे पगार हे रखडवले आहेत. ज्या ठेकेदाराने नागरी सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडवला आहे. त्या ठेकेदारावर महापालिकेने कारवाई करावी व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पगार देण्यात यावा अशी आमची आंदोलनातून मागणी आहे. असे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या
