लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटीचे ‘साऊंड’ चोरीला नगरसेवक सुभाष जगतापांचा डुप्लिकेट साऊंड सिस्टीम बसवल्याचा गौप्यस्फोट

पुणे :  बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटी रुपये किंमतीचे साऊंड चोरीला गेले. विशेष असे की त्याठिकाणी डुप्लिकेट साऊंड सिस्टीम बसवल्याचा गौप्यस्फोट नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला. यामुळे जागे झालेल्या प्रशासनाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पुणे महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक सुभाष जगताप यांनी दिली.

बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात 2 कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम बसवण्यात आली होती. कोरोना काळात दीड वर्षांपासून कोरोनामुळे नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील बॉश कंपनीचे सुमारे 2 कोटी रुपयांचे साऊंड चोरीला गेले आहेत. एवढेच नव्हे तर त्याठिकाणी डुप्लिकेट साऊंड बसवण्यात आले आहेत. प्रशासनाने याप्रकरणी काय कारवाई केली. याप्रकरणी प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल केला नाही असा गौप्यस्फोट नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला. नगरसेवक अविनाश बागवे यांनी प्रकाराची प्रशासनाला माहिती आहे? असा सवाल करत तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.
यावर उपायुक्त संतोष वारुळे यांनी यासंदर्भात विद्युत विभागाचे पत्र मिळाले आहे. याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Leave a Reply

%d bloggers like this: