नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेल्या हिंसक घटनांच्या निषेधार्थ भाजपचे धरणे आंदोलन

पुणे: मागच्या आठवड्यात त्रिपुरामध्ये जाळपोळ झाली असा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून नांदेड, मालेगाव, अमरावती येथे हिंसक घटना घडली. मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडल्यामुळे त्यांच्यावर हल्ले सुद्धा झाले या घटनेमुळे राज्यात राजकारण चांगलेच तापले. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनात नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेल्या हिंसक घटनेचा निषेध करण्यात आला.  या आंदोलनाला भाजपचे नगरसेवक धनंजय जाधव, भाजप युवा मोर्चाचे पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व व भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जगदीश मुळीक म्हणाले,त्रिपुरामध्ये जाळपोळ झाली असा व्हिडिओ व्हायरल झाला नव्हता. तरी नांदेड, मालेगाव, अमरावती येथे हिंसक घटना घडल्या. महा विकास आघाडी ला सरकारला राज्यात मतांचे राजकारण करायचे आहे. अमरावती जेथे या नागरिकांवर हल्ला झाला. त्या नागरिकांवर जोक हल्ला होणार होता तो राज्य सरकारला थांबवायला पाहिजे होता. म्हणून आज आम्ही नांदेड, मालेगाव, अमरावती येथे झालेल्या हिंसक घटनांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करत आहोत असे जगदीश मुळीक म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: