कोरोनानंतर नोकरी महोत्सव ही  काळाची गरज : सोनल पटेल 

पुणे : कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक स्तरावर  नोकरी महोत्सवाचे आयोजन करून युवा वर्गाला रोजगार मिळवून देण्याची आज गरज आहे,असे प्रतिपादन  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल यांनी येथे केले.    

 कर्तव्य सामाजिक संस्थेतर्फे व पुणे शहर युवक काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांच्या पुढाकाराने आयोजित नोकरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी  त्या बोलत होत्या. 

यावेळी  व्यासपीठावर माजी आमदार व  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे,काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल , युवा नेते रोहित टिळक, माजी नगरसेवक  वीरेंद्र किराड, नीता रजपूत, नगरसेवक रविंद्र धंगेकर, द. स. पोळेकर,   पीएमटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब अमराळे,युवक काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सौरभ अमराळे, प्रवीण करपे, सुरेश कांबळे, विक्रम खन्ना, आनंद खन्ना आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी सोनम पटेल म्हणाल्या की, कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. त्या काळात सर्वांनीच  गरजुंना मदत केली. मात्र आज अशारितीने नोकरी महोत्सव आयोजित करून युवा वर्गाला रोजगार देण्याचा उपक्रम म्हणजे एकप्रकारे कोविड योद्धयासारखेच हे   कार्य  आहे.हा एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे.कोरोनानंतर नोकरी महोत्सव ही  काळाची गरज आहे, त्याची व्याप्ती वाढली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

माजी आमदार मोहन जोशी यांनी कोरोनानंतर  आज खऱ्या अर्थाने   युवक – युवतींना रोजगाराची गरज आहे. त्यामुळे असे नोकरी महोत्सव ठिकठिकाणी आयोजित केले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली. तर रमेश बागवे यांनी या उपक्रमाचे स्वागत करून कर्तव्य सामाजिक संस्थने खऱ्या अर्थाने समाजाप्रती कर्तव्य पार पाडले आहे.सौरभ अमराळे हे सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य करत असून घरातूनच त्यांना राजकीय वारसा मिळालेला आहे. असेच कार्य करीत रहा अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. प्रास्ताविकात सौरभ अमराळे म्हणाले, वाढत्या महागाईबरोबरच कोरोनानंतर बेरोजगारी ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे नागरिकांसह युवा वर्गाला दिलासा मिळावा हा उद्देश या नोकरी महोत्सवामागे  आहे.आज दीड हजार युवक – युवतींना या महोत्सवातून रोजगार उपलब्ध होत आहे, याचे समाधान आहे. आभार प्रदर्शन आनंद खन्ना यांनी केले. 

Leave a Reply

%d bloggers like this: