महापालिकेच्या मुख्यसभेत भाजप नगरसेवक हरिदास चरवड यांनी समाविष्ट गावांमधील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा मुद्दा उपस्थित केला

पुणे: पुणे महानगरपालिकेची मुख्यसभा महापालिकेच्या‌ सभागृहात चालू आहे. सभेच्या प्रारंभीच भाजप नगरसेवक हरिदास चरवड यांनी समाविष्ट गावांमधील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रश्नावर प्रकाश टाकला. जिल्हा परिषदेकडून या कर्मचारी, शिक्षकांची नावे पाठविण्यात येत नसल्याची खंत व्यक्त करत नोकरभरतीसाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याची मागणी केली. वाघोली गावातील कर्मचाऱ्यांबाबत कुठल्याही तक्रारी नसताना त्यांचे गेली पाच महिने पगार झालेला नाहीत. गव्हासोबत किडेही रगडू नयेत. बोगस भरती झाली असली तर चौकशी करा, कारवाई करा मात्र प्रामाणिकपणे काम करणऱ्यांवर अन्याय करू नये, अशी मागणी करण्यात आली. 

तर, तक्रारी अर्ज देत नोकर भरती रोखण्याचे काही प्रकार सुरू आहेत. हा काळाबाजार रोखण्यात‌ यावा. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची पालिकेत नोकरभरती करताना शासनाच्या‌ सर्व नियमांची काटेकोरपण अंमलबजावणी करावी. राजकीय दबावापोटी भरती करू नये, अशी सूचना डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली.  यावेळी बाबुराव चांदेरे, योगेश ससाणे, वसंत मोरे, अमोल बालवडकर, सचिन दोडके, दिलीप वेडे पाटिल, पृथ्वीराज सुतार, आबा बागुल, दिपाली धुमाळ यांनी यावेळी भाषणे केली.

Leave a Reply

%d bloggers like this: