बक्षिसांची दिवाळी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : विद्यानगर येथील चलवादी शिक्षण संस्था व ऍड .रेणुका चलवादी यांच्या पुढाकाराने पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे बक्षिसांची दिवाळी या कार्यक्रमात प्रथम क्रमांक टी व्ही चे बक्षीस रुपाली संगपाळ यांनी पटकाविले तर फैमीदा बागवान द्वितीय क्रमांक (वॉशिंग मशीन ) व तृतीय क्रमांक ऐश्वर्या वाणी ( फ्रीज ) यांना देण्यात आला. लकी ड्रॉ मधून 20 महिलांना शिलाई मशीन ,ओवन , मिक्सर ,फॅन ,इंडक्शन ,कुकर , डिनर सेट ,आदी आकर्षक बक्षिसे प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार उल्पे , आयोजिका ऍड.रेणुका चलवादी ,शाहीर शिंदे ,प्राचार्या स्मिता लोंढे ,सायली शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली .क्रांतीनाना मळेगावकर व सह्याद्री मळेगावकर यांनी यावेळी मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला व विविध खेळ घेतले. जवळजवळ 1500 महिलांना भेटवस्तू व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिना कदम, जयश्री कदम ,ज्योती सचदेव ,आश्विनी मोहिते ,हौसराम आल्हाट ,निलेश धीवार ,सुमेध सोनवणे ,आदीनी सहकार्य केले .

Leave a Reply

%d bloggers like this: