Saturday, May 2, 2026
Latest NewsSports

पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत आदिनाथ कचरे, आरिन कोटणीस, मायरा शेख यांचे संघर्षापूर्ण विजय  

पुणे :  ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने  आयोजित सातव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरिज 2021  स्पर्धेत मुलांच्या गटात अहान सारस्वत, आदिनाथ कचरे, आरिन कोटणीस यांनी तर, मुलींच्या गटात मायरा शेख, माहिका रेगे, ओवी मारणे या खेळाडूंनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांच्या संघर्षपूर्ण पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित अहान सारस्वतने सहाव्या मानांकित आरव मुळ्येचा टायब्रेकमध्ये 6-5(2) असा पराभव केला.  चौथ्या मानांकित सक्षम भन्साळीने प्रज्ञेश शेळकेला 6-4 असे पराभूत केले. तर, मुलींच्या गटात चुरशीच्या झालेल्या लढतीत माहिका रेगेने काव्या तुपेचा टायब्रेकमध्ये 6-5(7-3) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

10वर्षाखालील मुलांच्या गटात आदिनाथ कचरेने राघव अगरवालचा 5-4(7-4) असा तर, आरिन कोटणीसने नील देसाईचा 5-4(1) असा पराभव करून आगेकूच केली. याच मुलींच्या गटात पाचव्या मानांकित मायरा शेखने आयुश्री तरंगेचा 5-4(0) असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. दुसऱ्या मानांकित ओवी मारणेने सातव्या मानांकित रेवा भटकलकचे आव्हान 5-4(0) असे संपुष्टात आणले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12 वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी:

अहान सारस्वत(1) वि.वि.आरव मुळ्ये(6) 6-5(2); सक्षम भन्साळी(4) वि.वि.प्रज्ञेश शेळके 6-4; राम मगदुम(3) वि.वि.अथर्व येलभर(8) 6-3; स्वर्णीम येवलेकर वि.वि.रोहन बजाज 6-2;

12वर्षाखालील मुली:  ध्रुवा माने(1) वि.वि.श्रावि देवरे 6-0; श्रेया होनकन(4) वि.वि.वीरा हरपुडे 6-3; माहिका रेगे वि.वि.काव्या तुपे 6-5(7-3); शिबानी गुप्ते वि.वि. स्वरा जावळे 6-3;

10वर्षाखालील मुले: आदिनाथ कचरे वि.वि.राघव अगरवाल 5-4(7-4); आरिन कोटणीस वि.वि. नील देसाई 5-4(1); आरव मुळ्ये(3) वि.वि.प्रत्यूश काळे(10) 5-0; हर्ष परिहार वि.वि.रिषभ ए. 5-1;

10वर्षाखालील मुली: स्वरा जावळे(1) वि.वि.अवनी देसाई(6) 5-3; सारा फेंगसे वि.वि.वेदिका निकम 5-1; मायरा शेख(5) वि.वि.आयुश्री तरंगे 5-4(0);

ओवी मारणे(2) वि.वि.रेवा भटकलक(7) 5-4(0);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading