Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट नाकारत्या कारभारामुळे शेतकरी उध्वस्त – संभाजी पाटील निलंगेकर

पुणे: अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळ ग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडणाऱ्या आघाडी सरकारने कर्जमाफी बाबतही ठाकरे सरकारची  फसवणूक केली. पिक विमा कंपन्यांना फायदेशीर अटी बनवून नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवले .नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या भ्रष्ट , नाकर्ते  आणि कोडग्या कारभारामुळे उध्वस्त केले असा घणाघाती आरोप.भारतीय जनता पार्टीचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.

या पत्रकार परिषदेला पुणे शहर भाजपाचे प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर, संजय देशमुख ,संजय मळेकर हेमंत लेले उपस्थित होते. संभाजी पाटील निलंगेकर यांनी या पत्रकार परिषदेत आघाडी सरकारच्या शेतकरी द्रोही भूमिकेचा पंचनामा सादर केला.

संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन हेक्‍टरी 25,000 हेक्‍टरी 50 हजार मदत्त द्या. अशा मागण्या करणारे उद्धव ठाकरे ,अजित पवार यांनी गेल्या दोन वर्षात राज्यातील विजेचा महापुराचा चक्रीवादळाचा फटका बसला शेतकऱ्यांना मदत करत शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अलीकडेच आघाडी सरकारने 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्याआधी जुलै मध्ये पुराने पावसाचा फटका बसलेल्यांना शेतकऱ्यांना अलीकडे आघाडी सरकारने 11हजार 500 कोटीचे  पॅकेज जाहीर केले होते. यामध्ये मदती मधील 7 हजार कोटी दीर्घकालीन उपाय योजना साठी तर 3 हजार कोटी पूर्ण बांधणी, पुनर्वसनासाठी आहेत. याचा अर्थ पूरग्रस्त अतिवृष्टी साठी केवळ 1500 कोटीची तातडीची मदत करण्यात आली. असे निलंगेकर म्हणाले.

संपूर्ण मराठवाड्यात विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रात  अतिवृष्टीमुळे  50 लाख हेक्‍टरवरील पिके जमीनदोस्त झाली. त्याचबरोबर हजारो हेक्टर सेक्टर जमीन खरडवुन निघाली. जनावारे वाहून गेली. घरे पडली मात्र सरकारी माहिती शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार केला गेल्याने शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली की केंद्र सरकारकडे बोट आपण आपली जबाबदारी टाकली तर त्यांनी गेल्या 2 वर्षात वारंवार केला. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात बंद पाडणारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाला नैसर्गिक आघाताचा मारा सहन करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी वेळ काढता आला नाही असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading