आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 95 नवीन रुग्ण तर 75 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कोरोनामुक्त पेक्षा जास्त आहे.  पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 95नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 75रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 059हजार  061इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 95हजार 998इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 6रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील4 तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9096जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 867रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 102रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4171 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: