Crime news – जेवण करायला चल म्हणून नेले अन् गुप्तांग कापले; तिघांवर गुन्हा दाखल

अक्कलकोट : गुरववाडी व कडबगाव रस्त्यावर 32 वर्षाच्या व्यक्तीला मारहाण करून ब्लेडने गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधीत व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

त्याला सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी दक्षिण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव महिबूब सैपन कलबुर्गी (वय 32, रा. तडवळगा, ता. इंडी, जि. विजयपूर) असे आहे. त्याच्या फिर्यादीवरुनच गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी (दि.  17) सायंकाळी ७ वाजता विजयपूरहुन मुन्ना चांदसाब पटेल, अब्दुल हमीदनजीर मुल्ला हे दोघे मोटारसायकलीने महिबूब सैपनसाब कलबुर्गी याच्या घराजवळ गेले. फिर्यादी कलबुर्गी यांना जेवणासाठी धाब्यावर चल म्हणून मणूर गावाजवळ आणले. त्या ठिकाणी हुसेन नबीलाल तोडंगी (रा. करजगी, ता. अक्कलकोट) हा तिसरा मित्र मणूर येथे आला.

हे तिघे मिळून फिर्यादीस कडबगाव (ता. अक्कलकोट) जवळ मित्राची गाडी खराब झाली आहे, असे सांगून घेऊन आले.  तिघांनी कलबुर्गी यांना शिवीगाळ करत लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. डोक्‍यात बिअरच्या बाटली मारत गुप्तांगावर ब्लेडने वार करून त्याला जखमी केले. गुप्तांग कापल्याने महिबूब बेशुद्ध पडला. गुरुवारी (ता. 18) तो शुद्धीवर आल्यानंतर दुसऱ्याच्या मोबाईलवरून नातेवाइकांना कळवले. यानंतर नातेवाईक व पोलिस घटनास्थळी पोचले.

Leave a Reply

%d bloggers like this: