Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 75 नवीन रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून  शंभर च्या आत आज  रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 75 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 113 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 057हजार  080इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 95हजार 842इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील2 तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 0रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9092 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 846रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 99रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5044 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply