पुण्यातील 5 गणेश मंडळांच्यावतीने गाईंना 5 हजार किलो चारा

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहण्यासाठी जय गणेश व्यासपीठ पुणे यांच्या वतीने  सासवड येथील श्री कृष्ण समृद्धी गो पालन सेवा संस्थेला ५ गणेश मंडळांच्या संयुक्त विद्यमाने ५  हजार किलो हिरवा चारा देण्यात आला. पुरंदरे यांना अपेक्षित असलेले सामाजिक कार्य करित गोसेवा करणाऱ्या कन्हैया दुबे आणि विजया घुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या उपक्रमात बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट , गुरुवार पेठेतील वीर शिवराज मित्र मंडळ , रविवार पेठेतील अखिल कापडगंज मंडळ , कोथरूड येथील श्री शनी मारुती बाल मंडळ आणि येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ ही गणेश मंडळे सहभागी झाली होती. पीयूष शाह ,सचिन पवार ,किरण सोनिवाल ,अमित जाधव ,गोविंद तिवारी ,संदीप जोशी ,मोहित झांजले ,जयेश शाह ,सतीश नहार यांनी आयोजन केले होते.
पीयुष शाह म्हणाले, श्री कृष्ण समृद्धी गो पालन सेवा येथे भाकड गाई घेऊन दुभत्या गाई शेतकरी बांधवांना दिल्या जातात. तेथील दूध मुलांना मोफत दिले जाते. तसेच  शेतकऱ्यांना शेणखत देखील विनामूल्य दिले जाते. बाबासाहेब पुरंदरे यांनी सम्पूर्ण जीवन इतिहास संशोधनात, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घराघरात अन् मनामनात पोहचवण्यासाठी जीवन व्यतीत केले. त्यांना अभिप्रेत असलेले गोधन सुरक्षा व  गोपालन करणाऱ्या संस्थेला सहकार्य करण्याच्या भावनेने पुण्यातील गणेश मंडळांनी मिळून शिवयोगी पुरंदरे यांना आदरांजली वाहिली.

Leave a Reply

%d bloggers like this: