कर्तव्य फाउंडेशनतर्फे राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन

पुणे : १८५७ च्या लढ्यातील वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त कर्तव्य फाउंडेशनतर्फे पुणे लष्कर भागातील राणी लक्ष्मीबाई उद्यान येथे अभिवादन करण्यात आले.यावेळेस लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पाॅवरलिफ्टर शाम साहनी, फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख, युवासेनेचे सनी गवते,शिवराम तरूण मंडळाचे अध्यक्ष असीफ शेख, सुरेश रासगे, महेंद्र जगताप, शाम बोत्रे, राजेश सहेरीया ,करमचंद बेद आदी उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, विकास भांबुरे व सुरेश रासगे यांनी आपल्या मनोगतातून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याचे व पराक्रमाची कौतुक करून त्यांना अभिवादन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: