Saturday, May 2, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एमपीएससीतर्फे लवकरच 7 हजार 168 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार 

पुणे :  राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे 7 हजार 168 पदांसाठी मागणीपत्र दिले आहे. त्यामुळे एमपीएससीतर्फे लवकरच विविध विभागातील पदांसाठी भरती केली जाईल, अशी माहिती राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने गट ‘अ’ पदांसाठी 2 हजार 827 , गट ‘ब’साठी 2641 जागा , गट ‘क’साठी 1700 जागा अशा एकूण 7 हजार 168 पदांचे मागणीपत्र एमपीएससीला दिले आहे. त्यामुळे लवकरच भरती प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि इतर कारणांमुळे भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता एकूण 7 हजार 168 पदांसाठी मागणीपत्र दिल्याने नोकरीसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे

वयोमार्यादा वाढीचे परिपत्रक लवकरच 

वयोमार्यादा संदर्भात बोलताना ते म्हणाले, करोंनामुळे हाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जवळपास वर्षभर एमपीएससीच्या परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने एमपीएससीच्या परीक्षेची वयोमार्यादा एक वर्षाने वाढवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यासंदर्भातील परिपत्रक लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर केले जाईल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading