एफआयएमइ व ‘लक्ष्य’ यांचा कुस्तीपटू साजन भनवालला पाठिंबा

पुणे : पुण्यातील नामवंत स्वयंसेवी क्रीडा संस्था ‘लक्ष्य’ आणि बंगळुरू येथील एफआयएमइ(फिम)या संस्थांनी उदयोन्मुख कुस्तीपटू साजन भनवाल याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपली प्रगती सुरू ठेवण्यासाठीआज एकत्रितपणे पाठिंबा  जाहीर केला आहे.

आपल्या गटात काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या साजन भनवालने 21 ऑक्टोबर रोजी नॉर्वे येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचाही मान मिळवला होता.

भनवालला पाठिंबा देत असल्याची घोषणा करताना ‘लक्ष्य’चे अध्यक्ष विशाल चोरडिया म्हणाले की, साजन भनवालला करारबद्ध करतानाच क्रीडा क्षेत्रासाठी लक्ष्यच्या साथीने पाठिंबा देण्याचा निर्णय एफआयएमइ(फिम)यांनी घेतला, याचा मला विशेष आनंद होत आहे. लक्ष्यने पाठिंबा दिलेल्या खेळाडूंची एकूण संख्या आता 24 झाली आहे.

हरियाणा, सोनिपत येथील रहिवासी असलेल्या भनवालने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. त्याआधी त्याने 2019 ज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, 2019 वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक आणि ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

यावेळी बोलताना एफआयएमइ(फिम)च्या भारत व दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थाकीय संचालक अंगज भंडारी म्हणाले की , अत्यंत सर्वसाधारण परिस्थितीतुन चमकदार कामगिरी करणाऱ्या साजन भनवालला पाठिंबा देताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. आपल्या कामगिरीने साजन देशाची मान उंचावेल अशी आमची खात्री आहे.

भंडारी पुढे म्हणाले की, गुणवान खेळाडूंचा सातत्याने शोध घेण्याच्या आमच्या प्रयत्नांना वेग देण्याची आणि भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करणारी खेळाडू शोधण्याची आमची मोहीम अधिक वेगवान करण्याची गरज असल्याचा आमचा विश्वास आहे. आम्ही त्यासाठी निश्चितच प्रयत्नशील आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: