मनसे चित्रपट सेनेचा संघ ठरला ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’चा विजेता 

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचा संघ हा ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’चा विजयी संघ ठरला आहे. तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा संघ उपविजेता ठरला आहे. तसेच आर पी आय चित्रपट आघाडीच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’ या एकदिवसीय स्पर्धेमध्ये 12 मॅच खेळवण्यात आल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्यावतीने 14 नोव्हेंबर रोजी ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या सिनेविंगच्या संघासह अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व पत्रकारांच्या संघाचा देखील संघाचा समावेश होता. त्यामुळे एरवी कलाकारांच्या प्रश्नांसाठी वेगवेगळे भिडणारे पदाधिकारी स्पर्धे निमित्त क्रिकेटच्या मैदानात खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांना भिडताना दिसले. ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, भाजपा चित्रपट आघाडी, आर पी आय,चित्रपट आघाडी, कॉंग्रेस, शिवसेना चित्रपट सेना, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग आदी पक्षांच्या सिनेविंगचा तसेच पत्रकारांच्या दोन संघाचाही सहभाग होता.

या ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’चे पारितोषिक वितरण पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर नगरसेवक दिपक मानकर, मनसे अध्यक्ष वसंत मोरे, गणेश सातपुते, आर पी आय राष्ट्रीय निमंत्रक ॲड मंदार जोशी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, लक्ष्मीकांत खाबिया, कार्यक्रमाचे आयोजक रमेशभाई परदेशी, सागर पाठक, आनंद कूंदुर आदी उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: