महानगरपालिका निवडणुकीत तीनचा प्रभाग राहणार -एकनाथ शिंदे

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग हा एक, दोन किंवा तीनचा होणार यावर यावर राज्यभर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आगामी महानगरपालिका निवडणुकीत तीनचा प्रभाग राहणार असून; राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला असल्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी एकनाथ शिंदे हे पुण्यात आले आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर भाजप पक्षा मधले नेते वारंवार टीका करतात उद्धव ठाकरे यांनी काही कोविड काळात काही काम केले नाही.  त्या टीकेला
एकनाथ शिंदे यांनी आज उत्तर दिले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात काय काम केले हे जनतेला माहीत आहे. नैसर्गिक संकट जे राज्यावर जे आले होते हे उद्धव ठाकरे यांनी दूर केले आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबयांचे सांत्वन

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शिवशाहीर पुरंदरे यांचे सुपुत्र प्रसाद पुरंदरे यांच्याशी बोलताना त्यांनी बाबासाहेबांविषयीच्या स्मृतींना उजाळा दिला. ठाणे येथे आयोजित सत्कार सोहळा तसेच महानाट्य ‘जाणता राजा’ बाबतच्या आठवणीही त्यांनी यावेळी सांगितल्या.

शिंदे म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राचा अपरिमित नुकसान झाले असून ही कधीही न भरून येणारी पोकळी आहे असं नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते.

Leave a Reply

%d bloggers like this: