व्यक्तिरेखेचं श्रेय लेखक आणि दिग्दर्शकाला – हृता दुर्गुळे

झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘मन उडू उडू झालं या’ मालिकेतील दिपू म्हणजेच अभिनेत्री हृता दुर्गुळे हि तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिच्या या व्यक्तिरेखेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. दिपू हि प्रेक्षकांना आपल्यातलीच एक वाटते, त्यामुळे प्रेक्षकांकडून हृताला या व्यक्तिरेखेसाठी उदंड प्रतिसाद देखील मिळतोय. या व्यक्तिरेखेचं श्रेय मालिकेच्या लेखक आणि दिग्दर्शकांना जातं अशी भावना हृताने व्यक्त केली.
याबद्दल बोलताना हृता म्हणाली, “या व्यक्तिरेखेच्या लोकप्रियतेचं श्रेय पडद्या मागच्या सूत्रधारांना जातं. मी खरंतर ती व्यक्तिरेखा म्हणून फक्त दिसते पण हे प्रत्येक पात्र उभं करण्यात लेखकाचा आणि दिग्दर्शकाचा मोठा वाटा असतो. मला मंदार देवस्थळी सारखे चांगले दिग्दर्शक मिळाले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.” हृता आणि दिपू मध्ये साम्य आहे का या विषयी बोलताना हृता म्हणाली, “मला अस वाटतं कि हृता आणि दिपूमध्ये एकच साम्य आहे ते म्हणजे चेहरा. दिपू जेवढी भित्री आहे तेवढी हृता नक्कीच नाहीये. जेवढी एखाद्या परिस्थिती मध्ये दिपू हलते तेवढी हृता नाही हलत. दिपू ज्या वातावरणात लहानाची मोठी झाली ते मी अनुभवलं नाहीये आणि तिच ही भूमिका करण्यामागची खरी मज्जा आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: