Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

कविता आणि फराळाने रंगली नाट्य चित्र कला अकादमीची मैफील

पुणे : नाट्य चित्र कला अकादमी पुणे या संस्थेतर्फे आयोजित दीपावली फराळ कार्यक्रम नुकताच पार पडला. दिवाळी फराळचा अस्वाद घेता घेता कलाकारांनी आपली कला सादर केली. संस्थेचे अध्यक्ष सुर्यकांत तिवडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट दिग्दर्शक विजय चव्हण उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात ‘देवा रे देवा’ या वेबसिरीजमध्ये संस्थेच्या कलाकारांना संधी देणार असल्याचे जाहीर केले. संस्थेचे कार्याध्यक्ष सीताराम नरके यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले. तसेच मराठी चॅनेलवर लवकरच नाट्य चित्र कलाअकादमीची मालिका रसिकांना पहाण्यास मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. लेखक, दिग्दर्शक सुरेश पाटोळे लिखित अण्णाभाऊ साठे यांचा चरित्र ग्रंथ सीताराम नरके यांनी संस्थेला यावेळी भेट दिला. 

या दिवाळी फराळ कार्यक्रमाला अभिनेते सुनील कुसेगावकर, नंदकुमार पाटील, करावके गायक संदीप क्षिरसागर, अशीष लोंढे, गणेश घुले, गुजाभाऊ ताम्हाणे, सिने अभिनेत्री संध्या लोंढे, ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर, राकेश परदेशी, गायक अभिनेते जयराज मोरे, अमीर शेख, चित्रपट दिग्दर्शक विजय चव्हाण, संस्थेचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ कवी सीताराम नरके,अशीष लोंढे, राकेश परदेशी आणि अभिनेते विश्वास रांजणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सचिव सुनील कुसेगावकर यांनी कार्यकमाचे सुत्रसंचालन केले तर गायक अभिनेते जयराज मोरे यांनी आभार मानले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading