Saturday, May 2, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता

पुणे:दक्षिण अंदमान समुद्राच्या क्षेत्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानंतर, आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील हे नवं संकट पुढील चोवीस तासात सक्रिय होणार आहे. परिणामी पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाचही दिवस हवामान खात्याने विविध जिल्ह्यांना तीव्र पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने उद्या पुण्यासह 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. 


उद्या पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, लातूर आणि नांदेड या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित तेरा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी वेगवान वारे वाहणार असून 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहणार आहे. यासोबतच आज परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. याठिकाणी सकाळपासूनच ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading