अभाविप तर्फे बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त अभिवादन

इंदापूर :अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व वनवासी कल्याण आश्रम बारामती च्या वतीने आज म.ए.सो. हायस्कूल येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले,कार्यक्रमाची प्रस्तावना हरिदास राऊत सर यांनी केली.
बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसामुंडा यांनाच जाते.
या वेळी म. ए. सो हायस्कूल चे मुख्यध्यापक उमेद सय्यद सर, शहर अध्यक्ष प्रा. हरिदास राऊत, वनवासी कल्याण आश्रम चे अध्यक्ष प्रा.शेखर जाधव, वनवासी कल्याण आश्रम चे बारामती सचिव प्रा. दत्तात्रेय शेरखाने, प्रा. गणपत जाधव, प्रा.चंद्रकांत वसावे, श्री.राहुल पोथरकर, विद्यार्थी परिषद पुर्णवेळ गोरखनाथ केंद्रे, राहुल पानसरे व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: