इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पुणे – इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या पुणे जिल्हा शाखेच्या वतीने “काळजी हृदयाची “आरोग्य सप्ताहांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी दहा ते दुपारी 1 यावेळेत इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या रास्ता पेठ व एम. जी. रोड या ठिकाणी या मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ब्लडप्रेशर, ईसीजी, दातांची तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, हाडांची घनता तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करण्यात येणार आहे. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा गरीब व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन इंडियन रेड क्रॉस सोसायटी पुणे जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरात सहभाग व नाव नोंदणीसाठी संपर्क- 02026067974, 02026130311, 9021993123

Leave a Reply

%d bloggers like this: