आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 48 नवीन रुग्ण तर 54 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून पनासच्या खाली आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 48नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 54रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 054हजार 011इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 95हजार 67इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 4रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 3तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9085जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 759रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 97रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4081
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
